Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जीवंत सोडणार नाही म्हणत प्रौढाला मारहाण
    क्राईम

    जीवंत सोडणार नाही म्हणत प्रौढाला मारहाण

    editor deskBy editor deskSeptember 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तुम्ही दोन्ही बाप लेक जास्त मातले आहे, असे म्हणत प्रौढाच्या अंगावर रिक्षा घेवून जात त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच शहरात कुठेही दिसले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना दि. २० रोजी कोंबडी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात दगडू सिताराम पाटील हे प्रौढ वास्तव्यास असून ते हमाली काम करतात. ते दि २० सप्टेंबर रोजी काम शोधण्यासाठी दाणाबाजारात गेले होते. सायंकाळपर्यंत त्यांना काम न मिळाल्याने ते कोंबडी बाजार परिसरात उभे होते. त्यावेळी सागर रमेश बेहरे हा त्याची (एमएच १९, व्ही ८८०५) क्रमांकाची रिक्षा घेवून त्यांच्या अंगावर घेवून गेला. तसेच रिक्षातून उतरवून दगडू पाटील यांचा रस्ता अडवून त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.