Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या. – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या. – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskSeptember 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    प्रत्येक माणसाच्या जीवनात एक छान सुरक्षित घर असावं हे स्वप्न असतं, ते शासनाच्या आवास योजनेतून पूर्ण होत आहे. तुम्हाला आज घर मिळाले, त्या घरात समृद्धी, जगण्याचा आनंद मिळू द्या अशा शुभेच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते पाळधी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते

    दोन वर्षात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात एकूण मंजूर असलेल्या घरकुलांपैकी सुमारे 125 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी आज प्राथमिक स्वरूपात
    पाळधी खुर्द येथिल शनिनगरात वास्तव्यास असलेल्या सौ. कोकिळाबाई लक्ष्मण परदेशी यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

    याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील, सरपंच सौ. लक्ष्मीबाई कोळी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मानकरी, शरद कोळी, चंदू माळी, विनोद पाटील, जब्बार शेख, लालाशेठ माळी, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले सूत्रसंचालन ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.