Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांच्या नावाची यादी फायनल ?
    राजकारण

    मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांच्या नावाची यादी फायनल ?

    editor deskBy editor deskSeptember 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात अजित पवार यांच्यासह बहुतांश विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. राष्ट्रवादीने अद्याप या यादीची पुष्टी केली नाही, पण ही यादी फायनल असल्याचे सांगितले जात आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसची येथे एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 25 संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. अजित पवार यांनी नुकतेच बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते. पण या बैठकीत बारामती येथून तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय पुणे हिट अँड रन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनील टिंगरे त्यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातूनच मैदानात उतरतील अशी माहिती आहे.

    खाली वाचा राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
    बारामती – अजित पवार
    येवला – छगन भुजबळ
    आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
    परळी – धनंजय मुंडे
    कागल – हसन मुश्रीफ
    दिंडोरी – नरहरी झिरवळ
    रायगड – अदिती तटकरे
    अहमदनगर – संग्राम जगताप
    खेड – दिलीप मोहिते-पाटील
    अहेरी – धर्मराव बाबा अत्राम
    कळवण – नितिन पवार
    इंदापूर – दत्ता भरणे
    उदगीर – संजय बनसोडे
    पुसद – इंद्रनील नाईक
    वाई खंडाळा महाबळेश्वर -मकरंद आबा पाटील
    पिंपरी -अण्णा बनसोडे
    मावळ – सुनील शेळके
    अमळनेर – अनिल पाटील
    जुन्नर – अतुल बेनके
    वडगाव शेरी – सुनील टिंगरे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाल्मिक कराडसह आरोपींवर आरोप निश्चित; पुढील सुनावणी ८ जानेवारीला

    December 23, 2025

    जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांना गर्दी

    December 23, 2025

    राष्ट्रवादी पुन्हा एकत्र?; महापालिकेसाठी दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.