Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर उत्साहात
    आरोग्य

    पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर उत्साहात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । तालुक्यातील पिंप्री खूर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मंगळवारी धरणगाव तालुका आरोग्य विभागाच्यावतीने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले.

    याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मयूर हिवरकर, आरोग्य सेविका आशा लोखंडे, पुष्पा पढयार, कविता चौधरी, आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी आदी सर्व उपस्थित होते . सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.

    यावेळी पालकवर्ग वैशाली अहिरे, मालती पाटील आदी उपस्थित होते. लसीकरण यशस्वीतेसाठी व्ही.एम. चौधरी, आर. आर. पावरा, आर.एस.पाटील, एस.के.शिंदे, एस.ए पटेल, जे.एस.पाटील, सचिन पवार, लिपिक सौरभ देसले, कर्मचारी सुदर्शन चव्हाण, अविनाश पाटील आदींनी कोविड नियम पालन करत लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर.एस.पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.