Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला; हाताला १३ टाके!
    जळगाव

    नशिराबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला; हाताला १३ टाके!

    editor deskBy editor deskNovember 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नशिराबाद शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील शाक्री मोहल्ला परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या नुरेन फातिमा शेख रईस या चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तब्बल १२ ते १३ टाके घालावे लागले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमधून नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जखमी नुरेन फातिमा हिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्या हातावरील जखमेवर १२ ते १३ टाके घालण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे.

    शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांवर तसेच लहान मुलांवर कुत्रे हल्ले करीत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

    अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवतानाही पालकांना आता भीती वाटू लागली आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यांवरून ये-जा करावी लागत आहे. एखाद्या निष्पाप बालकाचा किंवा नागरिकाचा जीव गेल्यानंतरच नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच आक्रमक कुत्र्यांबाबत नियमानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात. केवळ निवेदने स्वीकारून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कार्यवाही दिसली पाहिजे. शाक्री मोहल्ल्यातील नुरेन फातिमा हिच्यावरील हल्ल्याची घटना प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शरद पवार भाजपच्या डावात अडकणार नाहीत : हर्षवर्धन सपकाळ

    November 28, 2026

    धरणगावात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगरसेवक आक्रमक!

    November 28, 2026

    शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.