Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगरसेवक आक्रमक!
    जळगाव

    धरणगावात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगरसेवक आक्रमक!

    editor deskBy editor deskNovember 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक; उपनगराध्यक्षा रुपालीताई देवरे यांची नाराजी

    धरणगाव : प्रतिनिधी 

    शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

    यावेळी उपनगराध्यक्षा सौ. रुपालीताई देवरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक असतानाही त्यांच्या सूचनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी नगरसेविका सौ. कविता मच्छिंद्र पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात आमची सत्ता असतानाही पालिका प्रशासन आम्हाला जुमानत नाही. पालिकेचे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

    सदर बैठकीस कार्यालय अधीक्षक भिकन पारधी यांच्यासह नगरपालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक विलास महाजन, कडू आप्पा बयस, विजय भाऊ महाजन, सौ. अंजलीताई विसावे, शेख इब्राहिम हाजी, सौ. आक्काबाई चव्हाण, भूषण कंखरे, पप्पू कंखरे, गुलाब मराठे, चेतन जाधव, तौसिफ पटेल यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात नियमित स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

    November 28, 2026

    परीक्षा देऊन घरी येताना तरुणाचा दुर्देवी अपघातात मृत्यू !

    November 28, 2026

    घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेकडून घरफोडी : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी !

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.