Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेचा धक्क्याने कडगाव येथील महिला जागीच ठार
    क्राईम

    धावत्या रेल्वेचा धक्क्याने कडगाव येथील महिला जागीच ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMay 20, 2024Updated:May 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव – तालुक्यातील कडगाव येथील ४७ वर्षीय महिलेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सरलाबाई ईश्वर पाटील वय ४७ रा. कडगाव ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

    जळगाव तालुक्यातील कडगाव येथे वास्तव्याला असलेल्या सरलाबाई पाटील या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४३५च्या ११ आणि १३ च्या दरम्यान सरलाबाई पाटील या रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांना धाावत्या रेल्वेचा धक्का लागला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे. महिलेच्या पश्चात पती आणि मुलगा असा  परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.