Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ रिक्षाचा आणि अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू!
    क्राईम

    जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ रिक्षाचा आणि अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू!

    editor deskBy editor deskSeptember 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मयत तरुणाचे नाव आहे.

    काही अज्ञात व्यक्तींनी बबलू वाणी यांना रविवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत रिक्षातून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याची माहिती आहे. बबलू वाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बबलू वाणी यांच्या पायावर तसेच शरीराच्या उजव्या बाजूच्या पृष्ठभागावर जखमा आढळल्या आहेत. तर, या जखमा फरफटत नेल्यामुळे झाल्या असून बबलू वाणी यांना मारहाण झाली असावी, असा आरोप मयत वाणी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

    बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणणारे कोण होते, ती रिक्षा कुणाची होती, बबलू वाणी नेमक्या कोणत्या परिस्थितीत जखमा झाल्यात, याचा तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या संदर्भात मयत वाणी यांचा भाऊ शुभम वाणी यांच्या माहितीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करत आहेत. मयत बबलू वाणी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निवडणूक कामात बनावट रेल्वे तिकिटांचा ‘खेळ’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

    September 22, 2026

    चोपडा तालुक्यात खळबळ : जवानावर दोघांचा चाकूने हल्ला !

    September 22, 2026

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.