Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक कामात बनावट रेल्वे तिकिटांचा ‘खेळ’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !
    क्राईम

    निवडणूक कामात बनावट रेल्वे तिकिटांचा ‘खेळ’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskSeptember 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    निवडणूक साहित्य आणल्यानंतर प्रवासासंदर्भातील खोटे, बनावट रेल्वे तिकीट सादर करण्यासह बिलामध्ये विसंगती आढळून आली होती. हा प्रकार सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान घडला होता. याप्रकरणी निवडणूक शाखेच्या तत्कालीन मंडळ अधिकारी योगिता योगेश पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक कार्यक्रमा दरम्यान दि. ११ मार्च २०२४ रोजी तत्कालीन उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा निवडणूक शाखेतील तत्कालीन मंडळ अधिकारी योगिता पाटील यांना मुंबई येथून शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातून लोकसभा निवडणुकीसाठी बॅचेस, व्होटर स्लीप व इतर साहित्य घेऊन येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाटील यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यासाठीचे जाणे, येण्याच्या खर्चापोटी रेल्वेचे ३ तिकीट देयके सादर केली.

    होती. सादर करण्यात आलेल्या तिकिटांसंदर्भात तक्रार झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अभिलेख, प्रवास देयके, त्यासोबत सादर केलेले रेल्वे तिकीट यांची तपासणी करण्यात आली, त्यात योगिता पाटील यांनी सादर केलेली तिकीटे ही खोटी, बनावट व बिलांमध्ये विसंगती असल्याचे आढळून आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून योगिता पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाणे परिसरात उपोषण सुरू केले होते. मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच त्यांनी उपोषण सोडले.

    योगिता पाटील यांनी दि. १ मार्च रोजी भुसावळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दि. १४ मार्च २०२४ व दि. २ मार्च २०२४ रोजीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते भुसावळ असे एसी २ टायरचे तिकीट असे बिल सादर केले होते. त्या तिकीटांवरून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून दि. २४ जून २०२४ रोजी १९ हजार ९०५ रुपये मंजूर होऊन ते योगिता पाटील यांना अदा करण्यात आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ रिक्षाचा आणि अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू!

    September 22, 2026

    चोपडा तालुक्यात खळबळ : जवानावर दोघांचा चाकूने हल्ला !

    September 22, 2026

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.