Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलचा प्रचार्यासह, क्लर्क अटकेत
    क्राईम

    रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलचा प्रचार्यासह, क्लर्क अटकेत

    editor deskBy editor deskMarch 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग स्कूल (झेडआरटीसी) येथे लॉग बुकवर सही करण्यासाठी नऊ रुपयांची हजार लाच घेताना प्राचार्य सुरेश चंद्र व क्लर्क योगेश देशमुख या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान ही कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग स्कूल येथे अक्षय चौधरी यांनी ठेकेदारी पद्धतीने चारचाकी वाहन भाडेतत्त्वावर लावले आहे. त्यासंदर्भात लॉग बुकवर सही करण्यासाठी अकाउंटंट क्लर्क योगेश देशमुख यांच्याकडे गेले असता त्या मोबदल्यात देशमुख याने नऊ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम योगेश देशमुख याने स्वीकारून प्राचार्य सुरेश चंद्र यांना देताना दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पुणे येथील सीबीआय पथकाचे अधिकारी महेश चव्हाण यांना स्वीकारलेल्या रकमेवर संशयितांचे ठसे मिळून आले आहेत.

    सीबीआयच्या पथकाकडून योगेश देशमुख यांच्या सी-२५४ बंगल्यावर, तसेच प्राचार्य सुरेश चंद्र यांच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. दरम्यान, यापूर्वीही १६ ऑगस्ट २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यासाठी दोन लाखांची लाच घेताना मध्य रेल्वेचा भुसावळ येथील मंडल अभियंता एम. एल. गुप्ता यास तसेच कार्यालय अधीक्षक संजीव रडे यास ४० हजारांची लाच घेताना सीबीआय पथकाने पकडले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.