Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अर्ध्या तासात चोरट्यांनी लांबविली दहा लाखांची रोकड !
    क्राईम

    अर्ध्या तासात चोरट्यांनी लांबविली दहा लाखांची रोकड !

    editor deskBy editor deskJanuary 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील श्रीहरीनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून दहा लाखांची रोकड लांबवली. ही घटना भरदिवसा रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.

    भुसावळ शहरातील श्रीहरीनगरातील श्रीसत्य अपार्टमेंट समोरील घरमालक मुकेशकुमार कुमावत (वय ४५) हे साइटवर मार्बल फिटिंगच्या कामाला गेले होते. तर दुपारी त्यांच्या पत्नी भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. चोरट्याने ही संधी साधत दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व हॉलमध्ये ठेवलेल्या पलंगातील तब्बल दहा लाखांची रोकड घेऊन पोबरा केला. अर्ध्या तासाने कुमावत यांच्या पत्नी घरी परतल्यावर चोरीचा उलगडा झाला. सुदैवाने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले. दरम्यान, माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासण्यात आले. दरम्यान शहरामध्ये भर दिवसा घरफोडी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.