Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीचा प्रताप..प्रेमासाठी रचला दरोडा व स्वतःच्या अपहरणाचा डाव..!
    क्राईम

    तरुणीचा प्रताप..प्रेमासाठी रचला दरोडा व स्वतःच्या अपहरणाचा डाव..!

    editor deskBy editor deskNovember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – प्रेमासाठी काही पण करणारी आजची तरुणाईचे प्रताप दिवसेंदिवसमोर उघडत आहे. यातच धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दरोडा व अपहरणाची 25 रोजी शनिवारच्या रात्री घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस तपास करत असताना मिळत गेलेल्या माहिती नुसार प्रकरण उघडकीस आली अन् पोलिसांसह सर्वच जण चक्रावून गेले. यात संशयित तरुणी निशा मोठाभाऊ शेवाळे (वय २३) हिनेच दरोडा व स्वतःच्या अपहरणाचे नाट्य रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    या प्रकरणी आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८, रा. गायत्रीनगर, शाजापूर, मध्य प्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, रा. मोगलाई, धुळे) यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणीवर साक्रीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती ठीक झाल्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनी दिली. या प्रकरणातील चार संशयित फरार आहेत.

    असा शिजला अपहरणाचा डाव
    वडिलांच्या समोरून तरुणीला पळून जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आत्याच्या घरून दरोडा व अपहरण करण्याचा कट रचला गेला. ठरल्यानुसार तरुणी सरस्वतीनगरातील आपल्या आत्याच्या घरी तात्पुरत्या स्वरूपात राहण्यास गेली. विनोदने आपल्या हरीयाणातील चार साथीदारांसह दरोड्यासाठी लागणारी वस्तू व वाहन तयार केली. यानंतर रायपूरबारी गाठत विनोद आणि तरुणी एका वाहनाने शाजापूर तर त्यांचे इतर साथीदार रतलामकडे रवाना झाले.

    #criem
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026

    गॅस टंचाई गंभीर: घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.