Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गंभीर गुन्हे दाखल असलेले दोघांवर एमपीडीएची कारवाई !
    क्राईम

    गंभीर गुन्हे दाखल असलेले दोघांवर एमपीडीएची कारवाई !

    editor deskBy editor deskOctober 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्थानक व शनी पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

    शनिपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान, रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे या दोघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आला व त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानुसार दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

    शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात तर मयूर आलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, पोकों रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील यांनी कारवाई केली.

    #criem #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.