Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील लय भारी लॉजवरील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा !
    क्राईम

    जळगावातील लय भारी लॉजवरील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 12, 2023Updated:September 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील एका लॉजच्या आड अवैधरीत्या कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर यंत्रणेने छापा टाकत आंबटशौकीन पुरूषांसह पाच महिलांना ताब्यात घेतल्यानंतर शहरात खळबळ उडाली. ही कारवाई मंगळवार, 12 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटर पाठवल्यानंतर खात्री होताच छापा मारला. दरम्यान, या सर्व प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. याच प्रकारचा अनैतिक व्यवसाय हा अनेक लॉजेसवर सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

    ही कारवाई पोलीस निरिीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे आदींच्या पथकाने केली.

    शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.