Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हातनुर धरणाचे 41 दरवाजे उघडले; तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा..!
    जळगाव

    हातनुर धरणाचे 41 दरवाजे उघडले; तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 19, 2023Updated:July 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – राज्यभरात पाऊस जोरदार बरसात असून जळगाव जिल्ह्यातील पावसाचा जोर सकाळ पासून कायम आहे. तापी नदीच्या क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने हातनूर धरणाचे ४१ दरवाजे रात्री उघडले आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

    बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून सतत दार पाऊस सुरू असून रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तापी नदी वरील हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने हातनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आलेले आहे. मानवीय व पशु हानी होऊ नये यासाठी तापी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.


    १ लाख ३७ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

    मध्य प्रदेश व विदर्भात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला आहे. हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे दक्षता हातनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे उघण्यात आल्‍याने यातून ३८८२ क्युमेक्स १३७०९३ क्युसेक्स घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे.

    महाराष्ट्र मध्य प्रदेशचा संपर्क तुटला

    रावेर तालुक्यात जोरदार पावसाची बॅटिंग गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे लहान मोठ्या नद्यांना ही पूर आला असून महाराष्ट्र मध्य प्रदेश ला जोडल्या जाणाऱ्या निंभोरा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूचे वाहतूक थांबलेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.