Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबीची कारवाई: जळगावातील गोळीबार प्रकरणी एक अटकेत !
    क्राईम

    एलसीबीची कारवाई: जळगावातील गोळीबार प्रकरणी एक अटकेत !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात एक इसमाने गोळीबार केल्याची घटना दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किसन नजनपाटील यांना माहिती पडताच त्यांनी लागलीच आपल्या पथकाला याची माहिती देत संशयिताला अटक करीत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजी नगराच्या मागील बाजूस असलेल्या हुडको परिसरात दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अवैध अग्नीशस्त्रातून फायर केल्याची बातमी मिळाली त्यावरुन संशयित आरोपीच हुडको शिवाजीनगर जळगाव भागात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सखाराम बागुल, (वय 32, रा. शिवाजी नगर हुडको) असे सांगीतले. त्यावर त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे कडील अवैध अग्नीशस्त्रातून फायर केल्याचे सांगुन गुन्ह्याची कबूली दिल्याने त्यास अवैध अग्नीशस्त्रासह ताब्यात घेवुन गुन्ह्याचे पुढील तपासकामी जळगाव शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी विरुध्द जळगाव शहर पो.स्टे. ला 210/2023 भादवि कलम 307,34 आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पो.नि.विलास शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

    यांनी केली कारवाई
    स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोउपनिरी गणेश वाघमारे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, प्रितम पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, सचिन महाजन प्रमोद ठाकूर सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.