Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील व्यापारी सेक्सटॉर्शनला पडला बळी : उकळले पावणेआठ लाखांची खंडणी !
    क्राईम

    जळगावातील व्यापारी सेक्सटॉर्शनला पडला बळी : उकळले पावणेआठ लाखांची खंडणी !

    editor deskBy editor deskJune 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महिलेने फेसबुकद्वारे रीक्वेस्ट पाठवल्यानंतर व्यापार्‍याने ती अ‍ॅप्सेप्ट करीत चॅटींग सुरू केल्याने महिलेने अश्लील व्हिडिओ कॉल केल्यानंतर व्यापार्‍यानेदेखील त्यास प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी ती अश्लील चित्रफित बनवली व त्याआधारे नंतर ब्लॅकमेल करीत जळगावच्या 51 व्यावसायीकाकडून तब्बल सात लाख 77 हजार 777 रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍याने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    51 वर्षीय पीडीत व्यापार्‍याच्या तक्रारीनुसार, 16 ते 19 जून 2023 च्या त्यांच्या फेसबुकवर अनोळखी फेसबुक खातेधारक रीया अग्रवाल नामक महिलेने ओळख निर्माण केली. त्यानंतर मेसेंजवर चॅटींग व व्हिडिओ करीत कामोद्दीपक भावना उत्तेजीत केल्या व तक्रारदाराचा नग्न व्हिडिओ तयार केला. अनोळखी महिलेने पैशांची मागणी सुरू करीत पैसे न दिल्यास हा नग्न व्हिडिओ युट्यूब व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी एयु स्मॉल फायनान्स बँक व गुगल पे द्वारे सात लाख 77 हजार 745 रुपये उकळले. त्यानंतरही मागणी वाढतच चालल्यानंतर व्यापार्‍याने जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.

    #criem #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.