Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » युवारंगात मु.जे.ने मारली बाजी
    जळगाव

    युवारंगात मु.जे.ने मारली बाजी

    editor deskBy editor deskFebruary 14, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला.
    दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्य. प. सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे हजर होते. याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.सुधाकर चौधरी, अधिसभा सदस्य प्राचार्य सुनील पवार, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.शिवाजी पाटील, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, अमोल मराठे, नेहा जोशी, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे पदाधिकारी लिलाधर चौधरी, प्रा.नंदकुमार भंगाळे, प्रा.एस.एस.पाटील, किशोर चौधरी, मुरलीधर फिरके, प्रा.डी.ए. नारखेडे, मिलींद वाघुळदे, संजय चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील, प्राचार्य आर.एल.चौधरी, डॉ.अजित थोरबोले, धनंजय चौधरी, समन्वयक प्रा.शंकर जाधव, सहसमन्वयक प्रा.राकेश तळेले यांची उपस्थिती होती.
    अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी केवळ कलावंत म्हणून मोठे न होता त्यासोबत माणूस म्हणून देखील मोठे व्हा. यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपल्यातील उणीवा शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. प्रा.सुधाकर चौधरी यांनी मोठयांचा आदर करणे ही आपली संस्कृती असून तीचा विसर पडू देऊ नका यश तूमच्या मागे येईल असे मत व्यक्त केले. धनंजय चौधरी यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी असतात तसेच आठवणी जपण्यसाठी देखील असतात. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असतो असे मनोगत व्यक्त केले.
    प्रारंभी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सिलबंद पाकीटातून प्र-कुलगुरुंकडे निकाल सुपूर्द केला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांकडून अमोल पाटील, संघ व्यवस्थापकांपैकी प्रा.हरेश चौधरी, प्रा. विजय पालवे, डॉ. नंदा वसावे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रा. एस.व्ही.जाधव, प्रा. राकेश तळेले, शेखर महाजन, तुषार फिरके यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र राजपूत व डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी आभार मानले.

    पारितोषीकासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा : हास्य अभिनेता गौरव मोरे
    मना देश जय जय खान्देश’ या वाक्याने सुरवात करत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यांनी सादरीकरणाच्या वेळी पडलेल्या टाळया म्हणजे पारितोषिक असते. पारितोषिक मिळाले नाही तरी शेवटपर्यत प्रयत्न करा. यश मिळेल. असा सल्ला देत आम्ही देखील अशाच व्यासपीठावर कला सादर करुन पुढे आलो आहोत. मात्र मेहनत आणि परिश्रमाची तयारी ठेवा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. स्पर्धेत हरलो असे नाही तर आपले प्रयत्न अपूर्ण पडले यावर लक्ष द्या. असा सल्ला अभिनेता गौरव मोरे यांनी दिला.
    बक्षीस वितरण समारंभाचे मुख्य आकर्षण हे प्रसिद्ध विनोदी कलाकार गौरव मोरे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होते. युवकांचे विशेष आकर्षण गौरव मोरे यांनी आपली सिग्नेचर स्टेप व डायलॉग म्हणत सर्वच विद्यार्थ्यांचे मन जिंकली, तसेच प्रसिद्ध अहिराणी गीत तु झुमका वाली पोर….. हे गीत गात तरुणाईने त्यांच्यासोबत ठेका धरला त्या सोबतच त्याचे नावाजलेले संवाद सादर करून विनोदासाठी प्रसिद्ध असलेला त्याचा रुतबा दाखवीत सर्वांना हसवविले, तसेच त्यांच्या हस्ते विविध कला गुणांत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025

    कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाखांची रोकड लंपास !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.