
परिसराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत CCTV यंत्रणेचा शुभारंभ
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या CCTV यंत्रणेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आला.
या उपक्रमामुळे परिसरातील सुरक्षितता वाढण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळाबरोबरच वर्षभर परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ही सी.सी.टी.व्ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांच्या शुभारंभ प्रसंगी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सुधाकर सावळे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहीत निकम, अजित राणे, राकेश लोहार, डी. एन. तिवारी, अनिल अडकमोल, मुकेश शिंदे, नकुल सोनवणे, बाळा सोनार, भावेश बऱ्हाटे, किशोर जाधव, किरण अडकमोल यांची उपस्थिती होती.
मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने मंडळाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



