जळगाव : प्रतिनिधी
शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु हे रस्त्यांचे कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज प्रस्तावित कामे आणि सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली. दरम्यान ज्याठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत त्याठिकाणच्या रस्त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत थर्ड पार्टी ऑडीट केेले जाणार आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील रस्ते कामासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अमन मित्तल हे उपस्थित होते. शहरातील खराब रस्ते तसेच सुरू असलेले रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत नागरिकांमध्ये सत्ताधार्यांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात रस्त्यांची परिस्थीती सुधारली जावी यासाठी ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.
सात प्रमुख रस्त्यांची पाहणी
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक शहरातील रस्ते कामांची पाहणी केली. यात ख्वाजामियॉं चौक, सिव्हील हॉस्पीटलचा परिसर, शिवाजीनगर उड्डाण पुलाला जोडून असलेले रस्ते यासह सात ते आठ रस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखिल उपस्थित होते.
ऑडिटमध्ये गैर आढळल्यास मक्तेदारावर कारवाई ?
शहरातील काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी पूर्ण झाले आहेत. जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत ऑडीट केले जाणार असून त्यात काही गैर आढळल्यास संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिल्या आहे.
साळुंखे चौकात टी पुल उतरवा
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ती मार्गाचे पाणी जिल्हाधिकारी यांनी केली यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे टी मार्गाचा हा पाटणकर शाळेजवळ न उतरविता साळुंके चौक मार्गे उतरावा अशी मागणी केली.