जळगाव : प्रतिनिधी
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणासाठीचं त्याचं योगदान चिरंतन आहे. प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी बु. येथिल ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पाटील, सरपंच प्रकाशनाना पाटील , ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, यशवंत पाटील, गोकुळनाना पाटील, बबलू पाटील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ नाना पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक यांनी मानले.