Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास
    क्राईम

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    editor deskBy editor deskSeptember 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मोबाइल रिचार्ज अपडेट करण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने सेवानिवृत्त वृद्धाची मुदत ठेव प्री-मॅच्युअर करून तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. रमेश नारायण पाटील (क्य ७४, रा. महाबळ) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश पाटील यांना भामट्याने व्हॉट्सअॅपवर कॉल केला होता. गुगलवर जाऊन रिचार्ज अपडेट टाइप करा आणि डेबिट कार्डचे डिटेल्स भरा, तुमचे रिचार्ज होऊन जाईल, असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला, पाटील यांनी सांगितल्यानुसार प्रक्रिया करताच भामट्याने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्याशी लिंक असलेल्या नेटबँकिंगचा ताबा मिळवला. आरोपीने ९ व १० सप्टेंबर दरम्यान पाटील यांच्या खात्यावर असलेल्या मुदत ठेवी मुदतीपूर्वीच परस्पर मोडल्या. त्यानंतर खात्यातील १० लाख रुपये भामट्याने इतर खात्यांवर वर्ग करून पळवले. बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

    फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तातडीने तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    वरण-बट्टी खराब, तक्रार केली म्हणून मारहाण; जळगावात घडली घटना !

    September 13, 2026

    गुरुनानक नगरात थरार : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.