Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोल्ड कपडे घालून शूट ; दुबईत पोलिसांनी उर्फिला घेतल ताब्यात !
    राष्ट्रीय

    बोल्ड कपडे घालून शूट ; दुबईत पोलिसांनी उर्फिला घेतल ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नेहमी चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद हिच्यावर दुबईत कारवाई झाल्याचं समजतंय. बोल्ड कपडे परिधान करत व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी दुबईत उर्फीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय. दुबईतील ओपन एरियामध्ये उर्फी बोल्ड कपडे घालून शूट करत होती. याप्रकरणी तिथल्या काही लोकांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

    बिग बॉस ओटीटीमुळे सर्वांत आधी चर्चेत आलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. साखळ्या, कागर, पिशव्या, गोणी यांसारख्या वस्तूंपासून ती तिचे कपडे तयार करते आणि त्यावर फोटोशूट करते. चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इन्स्टाग्रामवर तिचे चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

    https://www.instagram.com/reel/CmGx9csptST/?utm_source=ig_embed&ig_rid=3d2b7e2e-5c9a-4ab9-a78c-41610c34a32f

     

    उर्फीची दुबई ट्रिप गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. आधी दुबईत पोहोचल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि आता तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नेमकं तिथे काय घडलं, याविषयीचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. दुबई पोलीस सेटवर आली होती, मात्र बोल्ड कपड्यांमुळे नाही असं तिने सांगितलं. “पोलीस सेटवर शूटिंग थांबवण्यासाठी आले होते, कारण लोकेशनची समस्या होती. आम्हाला शूटिंग करण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात आला होता, कारण ती शूटिंग सार्वजनिक ठिकाणी होती. प्रॉडक्शन टीमने वेळ वाढवून घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला तिथून निघावं लागलं. जेवढी शूटिंग बाकी होती, ती आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण केली. सेटवर पोलिसांचं येणं आणि माझे कपडे यांचा काहीच संबंध नव्हता”, असं तिने स्पष्ट केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    September 21, 2026

    चोपड्यात गणरायाला निरोप देताना भक्तीचा जल्लोष : लेझीम अन् ढोल-ताशांनी दुमदुमले शहर

    September 18, 2026

    गोरे होण्याच्या नादात स्वतःवरच उपचार; शिकाऊ डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू!

    September 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.