Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!
    जळगाव

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    editor deskBy editor deskSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार तसेच बँकेचे व्हाईस चेअरमन व आमदार अमोलदादा पाटील यांनी आज मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.

    या भेटीदरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध विषयांवर शरदचंद्रजी पवार साहेबांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बँकेचा NPA, बँकेची आर्थिक परिस्थिती, आर्थिक व्यवहार, शेतकरी व सभासदांशी संबंधित विविध बाबी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाबाबतही यावेळी चर्चा झाली.

    यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांनी जळगाव जिल्ह्यातील शेती व पिकांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी तसेच जिल्ह्यातील एकूण परिस्थिती याबाबत माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सध्याच्या परिस्थितीचा शेती व सहकार क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी आस्थेने विचारणा केली.

    दरम्यान, शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमदार अमोलदादा पाटील याचे वडील आबासो चिमणरावजी पाटील यांच्या प्रकृतीचीही आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत पवार साहेबांनी सदिच्छा व्यक्त केली.

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार, कृषी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

    याप्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार आणि व्हाईस चेअरमन तथा आमदार अमोलदादा पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा

    September 21, 2026

    २५ वर्षांची भक्ती अन् समाजसेवेची परंपरा; केळीच्या खोडातून साकारला ‘पिंप्राळ्याचा राजा’!

    September 21, 2026

    प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.