Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रामदेव बाबांचा माफीनामा जाहीर ; ‘त्या’ प्रकरणी मागितली माफी !
    राजकारण

    रामदेव बाबांचा माफीनामा जाहीर ; ‘त्या’ प्रकरणी मागितली माफी !

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबतीत त्यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

    काय होते प्रकरण ?
    पंतांजली योगपीठचे बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे एका कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 चे कलम दहा (1) (एफ) (एक) आणि (2) के नुसार वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस बजावली होती. बाबा रामदेव यांचे वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचवणारे होते. तसेच या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार महिला आयोगाने रामदेव बाबा यांना तीन दिवसात आपला खुलासा लेखी स्वरूपात पाठवावा अशी नोटीस पाठवलेली होती. त्यावर बाबा रामदेव यांनी स्वतःची बाजू मांडत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. मी कोणताही अपराध केलेला नसून समाजात महिलांना समानतेचा हक्क मिळावा या दृष्टीने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहे.

    काय म्हणाले रामदेव बाबा ?
    केंद्र सरकार द्वारे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानत सक्रिय सहभाग झालो आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजनात स्वयंसेवी संघटना सोबत ही सहभागी सहभागी झालो आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कधीही कोणताही हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रमात महिला सक्षमीकरणच्या दृष्टीने मी सहभागी झालो होतो. मात्र, माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.