Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वरण-बट्टी खराब, तक्रार केली म्हणून मारहाण; जळगावात घडली घटना !
    क्राईम

    वरण-बट्टी खराब, तक्रार केली म्हणून मारहाण; जळगावात घडली घटना !

    editor deskBy editor deskSeptember 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात दि.१० सप्टेंबर रोजी  तयार खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावरून नेलेली वरण, बट्टी खराब असल्याबाबत विचारणा केल्याने पंकज सुरेश बारी (३८, रा. माऊली नगर) यांना वरण, बट्टी सेंटर चालकासह दोन जणांनी मारहाण केली.

    पंकज बारी यांनी दुकानावरून वरण, बट्टी नेल्यानंतर ती खराब निघाली होती. त्याविषयी ते दुकानमालक दिनेश सपकाळ यांच्याशी बोलले असता त्यांनी बारी यांना ढकलून दिले. तसेच तुषार सोनवणे नामक व्यक्तीला बोलवून घेत दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी पंकज बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिनेश सपकाळ व तुषार सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026

    गुरुनानक नगरात थरार : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.