Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यापीठातर्फे चाळीसगावात “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला प्रारंभ
    जळगाव

    विद्यापीठातर्फे चाळीसगावात “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला प्रारंभ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 4, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव I प्रतिनिधी

    चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला शनिवार पासून प्रारंभ झाला.

    सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर पाटील अध्यक्षस्थानी होते, प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, संस्थेचे सहसचिव संजय रतनसिंह, संस्थेचे संचालक सुधीर पाटील,अविनाश देशमुख ,प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव. उपप्राचार्य डॉ. एस.डी. महाजन, उपप्राचार्य प्रा.डॉ. यु.आर मगर, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. देशमुख, प्रा.सुरेश कोळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    डॉ.संजय देशमुख यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहे. कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टीचे संकट यांना आपल्याला सामोरे जायचे आहे. स्वयंसेवक नक्कीच आपत्ती काळात संकटग्रस्तांना मानसिक आधार देतील व सहकार्य करतील त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन व शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. आर. जाधव, संजय पाटील यांनी स्वयंसेवकांना शिबीर यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

    चाळीसगाव विधानसभाचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आपत्ती काळात संकटग्रस्तांना आपत्तीतून बाहेर काढणे खूप मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्याची क्षमता युवकांमध्ये असते. बघणारे खूप असतात पण मदतीचा हात पुढे करून सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. आपण जिल्ह्यातून आलेले सर्व स्वयंसेवक नक्कीच भारतीय समाजाला मदतीचा, सहकार्याचा हातभार लावून आदर्श समाज निर्माण कराल यात शंका नाही. चाळीसगाव परिसराला अतिवृष्टीने व महापुराने वेढले. पशुधन ,शेती, दुकाने, घरे व इतर मालमत्ता यांचे अतोनात नुकसान झाले. परिसरात रोगराई पसरू नये, जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी बघणाऱ्यांपेक्षा मदत व सहकार्य करणार्यांची खरी गरज आहे. आपल्या हातून चार दिवसात समाज उपयोगी एक चांगले विधायक कार्य घडेल याची खात्री आहे असा आशावाद व्यक्त केला.

    संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम. बी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापनात मदत व पुनर्वसन शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी आपल्या महाविद्यालयावर सोपविली ही एक चांगली संधी मानून नैसर्गिक आपत्ती काळात आपल्या तालुक्यावर जे संकट आले आहे, त्यामुळे बरेच लोक बेघर झाले आहेत,कोणाची मालमत्ता नष्ट झाली,कोणाची शेती वाहून गेली तर कोणाची वित्तहानी झाली, पशुधनही मेले अशा परिस्थितीत संकटग्रस्तांची सेवा करण्याची, त्यांना धीर देण्याची व त्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही ही काळजी व सहकार्य आपल्याला या चार दिवसात करायचे आहे. या संकटावर मात करण्याचे प्रयत्न आपण करावे. तसेच संस्थेकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

    शिबीर यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. डॉ.पंकजकुमार नन्नवरे, प्रा. डॉ. ए. एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर. पी.निकम, प्रा.मंगला सूर्यवंशी परिश्रम घेत आहेत कार्यक्रम उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले, प्रा. डॉ. आर. पी. निकम यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.मंगला सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.