Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेर हादरले : दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचा मृत्यू !
    क्राईम

    अमळनेर हादरले : दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील त्रिमुर्ती नगरमधील महिलेसह तालुक्यातील जानवे येथील महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील जानवे येथील विजय गोविंदा कढरे यांची पत्नी रत्ना विजय कढरे यांनी १८ रोजी दुपारी दीड वाजता लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेतला होता. त्यानंतर त्यांना खाली उतरवून जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अमळनेर येथे उपचारार्थ पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करत आहेत.

    दरम्यान, शिरूड नाका येथील त्रिमुर्ती नगरमधील कविता अशोक मराठे हिने १८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर घराच्या छताला लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. दरम्यान, अशोक मराठे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते घरी परतल्यावर त्यांनी त्यांची आई चिंधाबाई यांना कविता कुठे आहे, असे विचारले. त्यांनी ती वर काही तरी काम करत आहे, असे सांगितले. परंतु, वर गेल्यावर त्यांना कविताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल नरेश बडगुजर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वनहक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन; जिल्हापेठ पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

    October 21, 2026

    टक्कल करून, वेश बदलून पोलिसांना गुंगारा; अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयिताला पकडले!

    October 21, 2026

    चोपड्यात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद : ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

    October 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.