Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वनहक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन; जिल्हापेठ पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
    क्राईम

    वनहक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन; जिल्हापेठ पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

    editor deskBy editor deskOctober 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    वनदाव्यांसह इतर मागण्यांकरीता लोक संघर्ष मोर्चातर्फे आदिवसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तेथे पाच दिवस विना परवानगी धरणे आंदोलन केले. तसेच आकाशवाणी, स्वातंत्र्य चौकात रस्तारोको करुन सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात लोक संघर्ष मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन धांडे यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    आदिवसी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी दि. १२ ऑक्टोंबर रोजी लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. सुमारे पाच दिवस सुरु असलेल्या आंदोलनात दि. १४ ऑक्टोंबर रोजी लोक संघर्ष मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन धांडे यांनी आदिवसांची बांधवांना घेवून शहरातील आकाशवाणी व स्वातंत्र्य चौकात जावून रास्ताराको केला. यावेळी पोलिसांनी मोर्चाचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना रस्ता मोकळा करण्यासाठी सांगितले असता, त्यांनी काही वेळ तेथे थांबून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते.

    धरणे आंदोलन सुरु असतांना आंदोलकांनी रस्तारोको करुन सार्वजनिक रस्ता अडवून मोठमोठ्याने नारेबाजी करुन सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावबंदी आदेश व प्रशासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन धरणे आंदोलन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टक्कल करून, वेश बदलून पोलिसांना गुंगारा; अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयिताला पकडले!

    October 21, 2026

    अमळनेर हादरले : दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचा मृत्यू !

    October 21, 2026

    चोपड्यात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद : ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

    October 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.