Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुःखाच्या प्रसंगात चोरट्यांची संधीसाधू चोरी : ५ तोळे सोन्याचे दागिने लंपास!
    क्राईम

    दुःखाच्या प्रसंगात चोरट्यांची संधीसाधू चोरी : ५ तोळे सोन्याचे दागिने लंपास!

    editor deskBy editor deskNovember 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे कुटुंबीय अंत्यविधीसाठी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलू कुलूप तोडून १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना दि. २४ नोव्हेंबर रोजी शहरातील रझा कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील रझा कॉलनीतील रहिवासी मोहम्मद सुफियान गुलाम नबी (वय ४१) हे वास्तव्यास असून त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यामुळे दि. २३ नोव्हेंबर रोजी आई व मुलीसह पुणे येथे अंत्यविधीसाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ ग्रॅमची सोन्याची चेन, १५ ग्रॅमचे झुमके, १५ ग्रॅम सोन्याचा तुकडा, ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठ्या असे एकूण ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. दि. २४ रोजी सकाळी हा प्रकार मोहम्मद सुफियान गुलाम नबी यांच्या पत्नीच्या लक्षात आला. त्यांनी या विषयी पतीला कळविले. ते घरी आले व त्यांनी या विषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजयसिंग पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतशिवारात काळाचा घाला : नातीसमोर आजोबांचा दुर्दैवी अंत; अपघातानंतर ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

    November 26, 2026

    जामनेर रोडवर मृत्यूचा थरार : पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहनचालक फरार!

    November 26, 2026

    जामिनावर बाहेर येताच मृत्यूचा सापळा : शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार; पुणे हादरले!

    November 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.