

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील बोदवड, शनिपेठसह आर्थीक गुन्हे शाखेतील प्रभारी अधिकाऱ्यांचे बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी सायंकाळी काढले. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजून गेली आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तीन पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले आहे. यामध्ये यामध्ये बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि आशिष लव्हंगळे यांची आर्थीक गुन्हे शाखेत, शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांची एएचटीयूच्या प्रभारी अधिकारी, आर्थीक गुन्हे शाखेचे पोनि नितीन पाटील यांची शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच रिक्त झालेल्या बोदवड पोलीस ठाण्याचा पदभार हा दुय्यम अधिकारी सपोनि विवेकानंद राळेभात यांच्यावर सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी सायंकाळी काढले असून अचानक अचानक प्रभारी अधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे.
या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, मानव संसाधन विभाग यांना एएचटीयूच्या प्रभारी अधिकारी या पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांनी यापुढे मानव संसाधन विभाग, जळगाव येथे आपल्या मूळ पदाचे पूर्णवेळ कामकाज करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
बदली आदेशातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी अथवा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ कर्तव्यावर हजर राहून अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने जनहित, प्रशासकीय कारणे तसेच कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.



