Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नमंडपात रक्ताचा सडा; २३ वर्षीय प्रेम धनगरचा निर्घृण खून
    क्राईम

    लग्नमंडपात रक्ताचा सडा; २३ वर्षीय प्रेम धनगरचा निर्घृण खून

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 18, 2026Updated:November 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रवीण पाटील जळगाव (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच प्रेम हा आपल्या गावी बोरनार येथे आला होता. बुधवारी सायंकाळी तो गावातील एका लग्नसोहळ्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचे कोणाशीतरी जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अज्ञात हल्लेखोराने प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रेम याचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत प्रेम याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कोण आहे आणि वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत गावातील कोणीही माहिती देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मयत प्रेम धनगर याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

    सदर तरुण प्रेम धनगर याच्यावर काही गुन्हे दाखल होते अशी माहिती मिळत आहे. तरुणाच्या अशा अचानक आणि निर्घृण हत्येमुळे धनगर कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    नागरी सेवांचा खोळंबा नको : बंद व नादुरुस्त वाहनांबाबत उपमहापौरांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम!

    November 18, 2026

    जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

    November 18, 2026

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.