Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरीशभाऊ म्हणजे संकटमोचक, पण लय लफडेबाज : गुलाबरावांच्या विधानाने सभागृहात हास्यकल्लोळ!
    राजकारण

    गिरीशभाऊ म्हणजे संकटमोचक, पण लय लफडेबाज : गुलाबरावांच्या विधानाने सभागृहात हास्यकल्लोळ!

    editor deskBy editor deskNovember 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आपल्या खास खान्देशी शैलीतील मिश्किल आणि रोखठोक भाषणांसाठी ओळखले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करत सभागृहात हशा पिकवला. जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत बोलताना त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख “संकटमोचक, पण लय लफडेबाज माणूस” असा केला. त्यांच्या या टिप्पणीमुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले गिरीश महाजन आणि संपूर्ण सभागृह खळखळून हसले.

    जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेनिमित्त राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील भंगाळे यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. भाषणाच्या शेवटी गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करत त्यांना मिश्किल टोला लगावला. “उद्या दोन जणांची माघार घ्यायची आहे आणि दोघेही भाजपचेच आहेत; पण गिरीश भाऊंनी ती माघार करूनही टाकली. हा मोठा कठीण आणि संकटमोचक माणूस आहे, पण लय लफडेबाज माणूस आहे,” असे पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्या आणि हास्याने दाद दिली.

    भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी औषध विक्रेते आणि लोकप्रतिनिधींच्या कामाची तुलना करत अनेक रंजक किस्से सांगितले. “औषध विक्रेत्यांवर नागरिकांचा इतका विश्वास असतो की लोक अनेकदा डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकलमधून डोकेदुखी किंवा तापाच्या गोळ्या घेतात, त्यामुळे तुम्ही अर्धे डॉक्टरच आहात. दुसरीकडे, आमदारांना ‘जनरल फिजिशियन’प्रमाणे काम करावे लागते. कोणाची बायको नांदत नसेल तर मुलीच्या आईला समजावून सांगून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याच्या ‘समाधानाच्या गोळ्या’ आम्हाला द्याव्या लागतात,” अशी कोपरखळी त्यांनी मारली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एचआर ठेवीदारांना न्याय मिळणार? राजूमामांनी सहकारमंत्र्यांकडे मांडला हजारो ठेवीदारांचा प्रश्न!

    November 17, 2026

    जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !

    November 17, 2026

    शेतकऱ्यांच्या मुलांची थट्टा थांबवा! सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रोहिणी खडसे आक्रमक !

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.