Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskNovember 15, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रत्येक प्रभागात जनसंपर्क वाढवून पक्षाची मजबूत फळी उभी करा

    धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि पुढेही राहील. हा बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकाने एकजुटीने कामाला लागावे. आपल्या १५ नगरसेवकांना जनतेने निवडून दिले; मात्र नगराध्यक्षपद थोड्याशा मतांनी हुकले म्हणून खचून जाऊ नका. पराभवातून शिकायचे, चुका सुधारायच्या आणि पुन्हा नव्या ताकदीने उभे राहायचे, हीच शिवसेनेची शिकवण आहे. संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद असून, मजबूत संघटनेच्या बळावरच सत्ता मिळते. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अधिक जोमाने काम करावे, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले.

    धरणगाव येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना कार्यालयात शहर शिवसेनेच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पदे मिरवण्यासाठी नाहीत, तर जनतेची कामे करण्यासाठी आहेत. सत्ता ही जनतेचे भले करण्याची संधी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांनुसार काम करा. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आदर्श घ्या. प्रत्येक नगरसेवक व पदाधिकाऱ्याने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहावे. जुन्या व अनुभवी शिवसैनिकांचे मार्गदर्शन घ्यावे. दर महिन्याला संघटनात्मक बैठका घ्याव्यात. धरणगाव शहराच्या विकासासाठी आतापर्यंत निधीची कमतरता भासू दिली नाही आणि यापुढेही भासू देणार नाही. दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला धावून जा. जळगाव व धरणगाव तालुक्यांतील उर्वरित नाला खोलीकरणाची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असून, पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ उपक्रमाचे कौतुक करून उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    संघटनेची मजबूत फळी उभी करा – प्रतापराव पाटील
    युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, संघटना हीच आपली खरी ताकद असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून मजबूत संघटनात्मक फळी उभी करावी. नियमित बैठका व जनसंपर्कावर भर द्यावा. लवकरच पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. काम करताना चुका झाल्या तरी घाबरू नका, त्यातून शिकून पुढे जा. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही मनोगत व्यक्त करताना पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकद वाढवावी, असे आवाहन केले. यावेळी तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील व उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

    यांची झाली नियुक्ती नवनियुक्त पदाधिकारी
    उपशहरप्रमुख : कमलेश भगवान बोरसे, सुरेश भास्कर महाजन, संतोष वाल्मीक महाजन, अहेमद नबुवतखां पठाण.
    शहर संघटक : प्रभुदास रोहीदास जाधव.
    उपशहर संघटक : गोविंदा सुनील मनोरे, किशोर साहेबराव पाटील.
    शहर कार्याध्यक्ष : रवींद्र रमेश महाजन.
    शहर उपकार्याध्यक्ष : सुदर्शन सुरेश भागवत.
    शहर समन्वयक : नाना लोटन मराठे.
    उपशहर समन्वयक : हेमराज चौधरी. तर युवा सेनेच्या शहर प्रमुख पदी कन्हैया महाजन यांची निवड करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शहरप्रमुख वीरेंद्र पुरभे यांनी धरणगाव शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीची व सद्यस्थितीची माहिती विशद केली. सूत्रसंचालन विभागप्रमुख रवी महाजन यांनी केले, तर आभार माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी मानले.

    यांची होती उपस्थिती
    शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जळगाव महानगरप्रमुख गणेश सोनवणे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शहरप्रमुख धीरेन्द्र पुरभे, उपनगराध्यक्ष विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदासअप्पा विसावे, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, विलास महाजन, पवन महाजन, बाळू जाधव, वासुदेव चौधरी, मोतीअप्पा पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बालकांच्या हसण्यातच खरा आनंद; शासकीय रुग्णालयात बालदिनाचा उत्साह!

    November 15, 2026

    आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू — पालकमंत्री गुलाबराव पाटील

    November 15, 2026

    रिक्षाला धडक, जाब विचारताच मारहाण; जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त वादात!

    November 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.