Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध
    जळगाव

    कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

    editor deskBy editor deskNovember 5, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याच्या जळगाव शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव शहरातील पारंपरिक लाल मातीची कुस्ती, आखाडे, तालमी आणि नवोदित पैलवानांना नव्या उमेदीने व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यांमध्येही संघटनेच्या माध्यमातून कुस्ती आणि मल्लविद्येच्या संवर्धनाचे कार्य सुरू आहे. संघटनेचे नेतृत्व सुप्रसिद्ध लेखक, अभ्यासू पैलवान तथा कुस्ती क्षेत्रातील जाणकार गणेश मानुगडे करीत आहेत. मूळचे कोल्हापूर येथील असलेले मानुगडे यांनी कुस्ती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

    जळगाव शहरातील लाल मातीची दोरी आता युवा नेतृत्वाच्या हाती

    जळगाव शहरातील लाल मातीच्या कुस्तीची सध्याची परिस्थिती चिंताजनक असून अनेक पारंपरिक तालमी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शहरात प्रशिक्षित NIS कोचची कमतरता, पुरेशा सुविधा नसणे तसेच दर्जेदार मॅट आणि लाल मातीचे आखाडे उपलब्ध नसल्यामुळे कुस्तीपटूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    या पार्श्वभूमीवर जळगाव शहराध्यक्ष म्हणून ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्यासमोर शहरातील कुस्ती आखाड्यांचा विकास, तालमींचे पुनरुज्जीवन आणि नवोदित पैलवानांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

    ॲड. पाटील यांचे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील तालमींचे वस्ताद, पैलवान, ज्येष्ठ मल्ल आणि कुस्तीप्रेमी यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध तसेच कुस्ती क्षेत्राचा असलेला अभ्यास यामुळे जळगाव शहरात कुस्तीला व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पारंपरिक मल्लविद्येचा वारसा जपत नवोदित पैलवानांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस ॲड. पाटील यांनी व्यक्त केला आहे. “लाल माती ही केवळ महाराष्ट्राची परंपरा नाही, तर महाराष्ट्राची ओळख आणि अस्मिता आहे. या परंपरेचे संवर्धन करून नव्या पिढीतून दर्जेदार मल्ल घडविण्यासाठी प्रयत्न करणार,” असा निर्धार त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील कुस्तीपटूंना सरावासाठी चांगला लाल मातीचा आखाडा, आधुनिक दर्जाची कुस्ती मॅट, प्रशिक्षक आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस आहे. भविष्यात विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये जळगावच्या पैलवानांचा ठसा उमटावा, यासाठी संघटित प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शहरातील ज्येष्ठ पैलवान, वस्ताद, तालमींचे पदाधिकारी, कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमी यांना एकत्रित करून कुस्ती क्षेत्राचे मजबूत संघटन उभारण्याचा मानसही ॲड. पाटील यांनी व्यक्त केला आहे. ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या निवडीबद्दल जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पैलवान, कुस्तीपटू, वस्ताद आणि कुस्तीप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील कुस्तीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल आणि नव्या पिढीतून दर्जेदार मल्ल घडतील, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

    ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या जळगाव शहराध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीशजी महाजन, खासदार स्मिताताई वाघ, खासदार रक्षाताई खडसे, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजयजी पवार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  जळगाव शहरातील लाल मातीच्या कुस्तीला नवी दिशा देत, नव्या पिढीतील पैलवान घडविण्याचे आव्हान ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिक जोमाने पुढे जाणार असल्याने जळगावच्या कुस्ती क्षेत्रासाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बंद दुकानाचे गेट वाकवले अन् मागचा दरवाजा कापला : चोरट्यांनी ६४ हजारांवर मारला डल्ला !

    November 5, 2026

    तरुणीच्या बनावट अकाउंटवरून प्रेमाचा सापळा : वरणगावात तरुणाला बोलावून गोळ्या झाडल्या; दोन आरोपी जेरबंद!

    November 5, 2026

    एसीबीच्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड : कोट्यावधींचे रोकड जप्त !

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.