Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसीबीच्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड : कोट्यावधींचे रोकड जप्त !
    क्राईम

    एसीबीच्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड : कोट्यावधींचे रोकड जप्त !

    editor deskBy editor deskNovember 5, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घर आणि बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे बिस्कीट, दागिने, चांदी व प्लॅटिनमचा खजिना; दोन घरे आणि लाखोंची रोकडही जप्त

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्या राहत्या घराची झडती तसेच जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, प्लॅटिनम आणि मौल्यवान वस्तू आढळून आल्या. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग एकचे उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे (वय ५५) कार्यरत आहेत. त्यांचे शहरातील आदर्श नगरातील स्वामी विवेकानंद सोसायटी येथे वास्तव्य आहे. त्यांच्यावर २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिसोदे यांच्या राहत्या घराची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. या तपासणीत एकूण ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह प्लॅटिनमचे दागिने, दोन घरे, घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेचा समावेश आहे.

    झडतीदरम्यान ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये किमतीचे तब्बल २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळले. यामध्ये सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चेन, पेंडंट, लॉकेट, बांगड्या आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये किमतीचे ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू आढळल्या. यात चांदीची लगड, बिस्किटे, वाट्या, ताटे, तुकडे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. तसेच ३ लाख ५५ हजार २८६ रुपये किमतीचे १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळून आले. विशेष म्हणजे, घरझडतीत ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख रक्कम आढळली.

    शिसोदे यांच्या नावाशी संबंधित आदर्श नगर परिसरातील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये अशी नोंदविण्यात आली आहे. या दोन्ही घरांची एकूण किंमत १ कोटी १० लाख रुपये आहे. याशिवाय घरातील वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोन्या-चांदीचे दागिने, प्लॅटिनम, रोख रक्कम, दोन घरे आणि घरातील मौल्यवान वस्तू अशा स्वरूपात ही कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे. या प्रकरणात शिसोदे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे तपास यंत्रणेच्या माहितीत नमूद आहे. या मालमत्तेच्या स्रोताबाबत तसेच इतर आर्थिक व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

    ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन, संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बंद दुकानाचे गेट वाकवले अन् मागचा दरवाजा कापला : चोरट्यांनी ६४ हजारांवर मारला डल्ला !

    November 5, 2026

    तरुणीच्या बनावट अकाउंटवरून प्रेमाचा सापळा : वरणगावात तरुणाला बोलावून गोळ्या झाडल्या; दोन आरोपी जेरबंद!

    November 5, 2026

    उद्योगांना मिळणार प्रोत्साहन, तरुणांना रोजगाराची संधी : आ.भोळे यांच्या पाठपुराव्याला यश!

    November 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.