Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीच्या बनावट अकाउंटवरून प्रेमाचा सापळा : वरणगावात तरुणाला बोलावून गोळ्या झाडल्या; दोन आरोपी जेरबंद!
    जळगाव

    तरुणीच्या बनावट अकाउंटवरून प्रेमाचा सापळा : वरणगावात तरुणाला बोलावून गोळ्या झाडल्या; दोन आरोपी जेरबंद!

    editor deskBy editor deskNovember 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सोशल मीडियावरील मैत्रीच्या आमिषाला गुन्हेगारी कटाची जोड देत तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तरुणाला मृत्यूच्या सापळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार वरणगावात उघडकीस आला आहे. फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर १ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावला असून, या कटातील भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास डिवरे (वय २७, दोघे रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना ताब्यात घेतले आहे. जुन्या मारहाणीचा अपमान आणि त्यातून पेटलेली सूडभावना या रक्तरंजित हल्ल्यामागे असल्याचे तपासात समोर आले आहे.

    सरफराज सय्यद सकिर सय्यद (२४, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) याला इन्स्टाग्राम खात्यावरून तरुणीच्या नावाने मेसेज आणि कॉल केले. १ नोव्हेंबर रोजी सकाळपासून त्याच्याशी संवाद साधत सायंकाळी वरणगाव येथे भेटण्यासाठी बोलावण्यात आले. सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढविला. आणि त्यानंतर गावठी कद्वयातून दोन राऊंड गोळीबार केला. हल्ल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी संबंधित इन्स्टाग्राम खाते अवघ्या ४५ मिनिटांत बंद केले. मात्र, डिजिटल पुरावे मिटविण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला. हे खाते चालविण्यासाठी भूषण सावळे याने अल्पवयीन मित्राच्या मोबाईलमधील ई-मेलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले पोलिसांच्या तपासानुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर वाहनाच्या अपघातानंतर सरफराज आणि त्याच्या मित्रांचा भूषण व सिद्धार्थ यांच्याशी वाद झाला होता. या घटनेचा व्हिडिओही चित्रित करण्यात आला होता. त्याच अपमानाचा बदला घेण्याचे आरोपींनी ठरविल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. भूषणने तयार केलेल्या बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून सरफराजशी संपर्क साधण्यात आला. विश्वास संपादन केल्यानंतर भेटीचा बहाणा करून त्याला वरणगावात बोलावण्यात आले आणि नियोजनाप्रमाणे हल्ला केला.

    गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पूर्वीचा साथीदार मयत सागर कहार याने मृत्यूपूर्वी दिल्याचे भूषणने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता गुन्ह्यात वापरलेला कट्टा, दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे. दोन्ही आरोपींना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र बल्टे, संतोष पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा व पथकासह वरणगाव पोलिस ठाण्याचे सपोनि अमित कुमार बागुल, पीएसआय मंगेश बंडकोळी, पीएसआय इसमाईल शेख, पोलिस सुखराम सावकारे फिरोज पठाण, मनोहर बनसोडे, विजय बावस्कर, ईश्वर तायडे, रूपेश हिरोळे, संजय ठाकणे, गोपी सोनवणे, प्रशात ठाकुर, यासिन पिंजारी आदी ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बंद दुकानाचे गेट वाकवले अन् मागचा दरवाजा कापला : चोरट्यांनी ६४ हजारांवर मारला डल्ला !

    November 5, 2026

    एसीबीच्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड : कोट्यावधींचे रोकड जप्त !

    November 5, 2026

    उद्योगांना मिळणार प्रोत्साहन, तरुणांना रोजगाराची संधी : आ.भोळे यांच्या पाठपुराव्याला यश!

    November 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.