Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या पैलवानांची आंतरराष्ट्रीय झेप : नेपाळमध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड
    क्राईम

    जळगावच्या पैलवानांची आंतरराष्ट्रीय झेप : नेपाळमध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड

    editor deskBy editor deskOctober 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख पैलवानांना वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला बळ दिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जळगावच्या पैलवानांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

    उत्तराखंड येथे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. या यशानंतर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

    या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आणि त्यांच्या क्रीडा वाटचालीला सहकार्य करण्यात आमदार राजू मामा भोळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. खेळाडूंना योग्य संधी, प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

    जळगावच्या क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत नवोदित पैलवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आमदार राजू मामा भोळे यांचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जळगावच्या खेळाडूंना भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  जळगावच्या पैलवानांच्या यशात सहकार्याचा हातभार लावणाऱ्या आमदार राजू मामा भोळे यांचे मनःपूर्वक आभार!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आकाशवाणी चौकात पोलिस आणि दुचाकीस्वार आमनेसामने; व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ!

    October 29, 2026

    दोन वर्षांपासून धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

    October 29, 2026

    बांधकाम मंजुरी २०२१ साल ची पण भंगाळे फॉर्म / मल्टी टच हेल्थकेअर हॉस्पिटल च्या बिल्डिंगला मालमत्ता करची आकारणीच नाही

    October 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.