Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांधकाम मंजुरी २०२१ साल ची पण भंगाळे फॉर्म / मल्टी टच हेल्थकेअर हॉस्पिटल च्या बिल्डिंगला मालमत्ता करची आकारणीच नाही
    क्राईम

    बांधकाम मंजुरी २०२१ साल ची पण भंगाळे फॉर्म / मल्टी टच हेल्थकेअर हॉस्पिटल च्या बिल्डिंगला मालमत्ता करची आकारणीच नाही

    editor deskBy editor deskOctober 29, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपाचा भोंगळ कारभार उघड : ॲड.पियूष पाटील यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहर मनपा हद्दीतील ओंकार नगर जिल्हा पेठ परिसरातील जळगाव जिल्हा केमीस्ट अध्यक्ष सुनील रामदास भंगाळे यांच्या मालकीचे असलेले मल्टी टच हेल्थकेअर हॉस्पिटल व भंगाळे फार्मा या आस्थापनेची परवानगी ही २०२१ साली देण्यात आली होती परंतु मनपा मालमत्ता करा ची आकारणी ५ वर्ष होऊन देखील करण्यात आलेली नसल्या बाबत ची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मनपा प्रशासन यंत्रणा यांचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी सविस्तर तक्रार केलेली आहे.

    यामध्ये म्हटले आहे की ; सदर अस्थापणे बाबत ५ वर्षापूर्वी जळगाव शहर महानगरपालिका नगररचना विभागामार्फत मंजुरी घेण्यात आली होती.यानंतर तब्बल ५ वर्ष होऊन देखील सुनील रामदास भंगाळे हे जळगाव जिल्हा केमिस्ट चे अध्यक्ष असल्याने तसेच त्यांचे बंधू हे जळगाव शहर महानगरपालिकेतील माजी महापौर तसेच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून सदर आस्थापनेला मनपा मालमत्ता कराची आकारणी होऊ दिलेली नाही. तसेच सदर आस्थापनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामात अनियमितता त्रुटी असून याची मंजुरी देखील चुकीच्या पद्धतीने दबावाला बळी पडून तसेच मनपा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार होऊन देण्यात आलेली आहे.

    पार्किंग/बेसमेंटच्या जागेत थाटले भंगाळे फार्मा :

    या आस्थापनेच्या बांधकामांमध्ये दाखवण्यात आलेल्या पार्किंग / बेसमेंटच्या जागेमध्ये केमिस्ट अध्यक्ष सुनील रामदास भंगाळे यांच्या मालकीच्या असलेले भंगाळे फार्मा डिस्ट्रीब्यूटर चे भव्य गोडाऊन करण्यात आलेले आहे. पार्किंग बेसमेंट चा वापर देखील या ठिकाणी वाणिज्य पद्धतीने सुरू असल्याबाबत तक्रारदार ॲड पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे. या ठिकाणी भविष्यात आग लागली काही दुर्घटना घडली तर रुग्णालयात येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची मोठी जीवित हानी या ठिकाणी घडू शकते तसेच सदर बिल्डिंगला कुठलीही पार्किंगची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी येणारे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक इत्यादींच्या दुचाकी – चार चाकी या पूर्णपणे रस्त्यावर लागतात यामुळे त्या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो तसेच बाहेर मनपा रस्त्यावर ठेवण्यात आलेले जनरेटर देखील उचलण्यात यावे याबाबत तक्रार अर्जात म्हटले आहे.

    अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे अन् मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार :

    या प्रकरणाबाबत तक्रारदार ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. यामुळे भंगाळे पुन्हा वादाच्या चौकटीत अडले आहे. सुनील भंगाळे यांनी स्वतःचे अतिक्रमण काढून तसेच मनपा चा कर – थकबाकी देऊन आपली नैतिकता दाखवावी :

    आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत विष्णू रामदास भंगाळे यांनी अनेक वल्गना केलेले आहे. यामध्ये आम्ही सर्व नियमित भरतो आमचे सर्व कायदेशीर असते इत्यादी परंतु प्रत्यक्षात बघितले असता प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या पदाचा यांनी दुरुपयोग केला आहे हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. स्वतःला समाज भूषण, केमिस्ट भूषण,राष्ट्र भक्त इ म्हणून मिरवणाऱ्यांनी आधी आपले अतिक्रमण काढावे ५ वर्षांचा जाणीवपूर्वक बुडवलेला मालमत्ता कर भरावा व हे फुकटे धंदे सोडावे व सामान्य जनतेला त्रास होणार नाही असे वागावे म्हणून ॲड. पियुष पाटील यांनी म्हटले आहे.  या गंभीर प्रकाराबाबत जळगाव शहर मनपाचे आयुक्त आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या पैलवानांची आंतरराष्ट्रीय झेप : नेपाळमध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड

    October 29, 2026

    आकाशवाणी चौकात पोलिस आणि दुचाकीस्वार आमनेसामने; व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ!

    October 29, 2026

    दोन वर्षांपासून धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

    October 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.