

अमळनेर : प्रतिनिधी
शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मागासवर्गीय महिलेला तुझ्या पतीला व मुलाला फाशी देऊन मारून टाकेल, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या शहरातील एका भागातील एकावर अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागातील एकाच्या ओळखीने पीडित महिलेला भाड्याने घर मिळाले होते. महिलेचे पती बाहेरगावी असल्याने गेल्या दोन वर्षांपासून तोच महिलेच्या पती व मुलगा नसताना घरी यायचा अन् तुझे माझे प्रेम संबंध आहेत, असे तुझ्या पतीला सांगून व धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवायचा. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता मुलगा क्लासला गेला असताना त्याने महिलेला तू जर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर मी तुझ्या पतीला आणि मुलाला फाशीला लटकवून मारून टाकेल, अशी धमकी दिली अन् महिलेची इच्छा नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेला पती घरी आल्यावर त्याला तसेच तिच्या भावाला घटना सांगितल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करत आहेत.



