Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलांना त्रास देणाऱ्यांना जाब विचारला; चॉपरने हल्ला, एकाचा मृत्यू!
    क्राईम

    महिलांना त्रास देणाऱ्यांना जाब विचारला; चॉपरने हल्ला, एकाचा मृत्यू!

    editor deskBy editor deskOctober 21, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महिलांच्या अंगावर दुचाकीचा लाईट का चमविती याचा जाब विचारल्याने दोध तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये किरण विठ्ठल पाटील (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ४६, दोघ रा. माऊलीनगर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार दि. २० ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भुसावळ रस्त्यावरील माऊली नगरात घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी तपासचक्र फिरवित काही वेळातच दोन संशयितांना वाव्यात घेतले आहे.

    जखमी किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन, शहरातील भुसावळ रस्त्यावरील माऊली नगरात किरण पाटील है वास्तव्यास असून ते सुप्रिम कंपनीत नोकरीस आहे. ते परिसरात राहणाऱ्या किशोर पाटील यांच्यासह मित्र मंडळींसोबत परिसरातील मंडळ्ळाजवळ बसलेले होते, यावेळी त्याच परिसरात राहणारे काही तरुणांनी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या अंगावर दुचाकीचा लाईट चमविला, दरम्यान, महिलांनी त्या तरुणांना जाच विचारला असता त्यांच्यात वाद झाला. हा प्रकार मंडळाजवळ बसलेल्या किरण पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी लागलीच वाद सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेत तरुणांना लाईट का चमवित आहात असा जाब विचारला. परंतू वाद घालणारे तरुण हे मद्याच्या नशेत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. जाब विचारल्यावरुन दारुच्या नशेत अखलेल्या तरुणांनी किरण पाटील यांच्यासोबत वाद घालीत त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्यानंतर त्या तिघांपैकी एकाने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने किरण पाटील यांच्या छातीवर वार केले. वार होताच किरण पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि त्यांचा लागलीच मृत्यू झाला.

    सोबत राहणाऱ्या किरण पाटील यांना दारुच्या नशेत असलेले तरुणांकडून मारहाण होत असल्याने किशोर पाटील हे भांडण सोडवित असतांना त्या तिघांनी किशोर पाटील यांच्यावर देखील हल्ला केला. त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला धारदार शस्त्राने हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले आहे. परिसरातील नागरिकांनी दोघ जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर किरण पाटील यांना मयत घोषीत केले. तर जखमी किशोर पाटील यांच्यावर उपचार सुरु आहे.

    घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी मक्ताच्या कुटुंचियांचे सांत्वन देखील केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरुच्या नशेत तरुणांवर वार करणारे संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वार केल्यानंतर संशयित घटनास्थळहून पसार झाले, दरम्यान, पोलिसांकडून त्या संशयितांचा कसून शोध देखील घेतला जात आहे. दरम्यान, महिलांची छेड काढणाऱ्यांना हटकल्यामुळे संशयितांनी तरुणांवर हल्ला केल्यामुळे संशयितांना पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याचे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बचन आव्हाड, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, आकाश राजपूत व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी माहिती जाणून घेत गुन्हे शोध पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वनहक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन; जिल्हापेठ पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

    October 21, 2026

    टक्कल करून, वेश बदलून पोलिसांना गुंगारा; अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयिताला पकडले!

    October 21, 2026

    अमळनेर हादरले : दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचा मृत्यू !

    October 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.