Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साकळीजवळ कार-दुचाकीची समोरासमोर धडक! तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर
    क्राईम

    साकळीजवळ कार-दुचाकीची समोरासमोर धडक! तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

    editor deskBy editor deskOctober 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील चोपडा मार्गावर साकळी या गावाजवळील साईराम जिनिंगच्या समोर दुचाकी आणि कारचा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तीन जण हे जखमी झाले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर त्यातील दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  साकळी गावाच्या जवळ साईराम जिनिंग आहे. या जिनिंगच्या समोर यावल कडून चोपड्याकडे कार क्रमांक एम. एच. ०५ बी. एल. ४७४९ घेऊन चालक विनोद कुमार हा श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जात होता. तर साकळी कडून यावल कडे दुचाकी क्रमांक एम. पी. ६८ झेड. एफ. १०३७ घेऊन प्रवीण किशोर तेली (वय २१), हर्षल राजेंद्र माळी (वय १७) व तय्यब राजू तडवी (वय १६) रा. साकळी हे जात होते. दरम्यान दोघं वाहनाचा समोरासमोर अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तिघे जखमी झाले. यातील प्रविण तेली याला डोक्याला जबर दुखापत आहे आणि हर्षल माळी याला देखील डोक्यास दुखापत असल्याने दोघांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ….आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावा!:संजय राऊतांची मागणी !

    October 19, 2026

    वरणगाव रोडवरील नाल्यात मृतदेह; भुसावळमधील सलग घटनांनी नागरिकांमध्ये चर्चा

    October 19, 2026

    भुसावळमध्ये दरोडेखोरांच्या संशयित टोळीवर छापा : शस्त्रसाठा आणि दोन दुचाकी जप्त

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.