
भुसावळ : प्रतिनिधी
शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच दरोडाच्या उद्देशाने एकत्र आल्याचा संशय असलेल्या टोळीचा डाव बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावला, वांगोळा रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील स्वामी विहारच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, मिरची पावडर, लोखंडी चाकू, स्टीलची फोल्डिग स्टिक, ३० फूट लांबीचा चोर आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांची चाहूल लागताच अन्य तीन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना काही संशगित दरोड्याच्चा उद्देशाने एकत्र आल्याची गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी पथकासह पंचांच्या उपस्थितीत स्वामी विहार परिसरातील कमानीजवळ छापा टाकला. त्यावेळी दोन दुचाकीवर सहा संशयित आढळून आले. पोलिसांना पाहताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला; मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत उर्वरित तिघांना ताब्यात घेतले. दोन्ही दुचाकीही जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे रोहनसिंग सतनामसिंग चाचरा (बब २४), आर्यन सुनील मोरे (वय २२, दोघे रा. भिरूड हॉस्पिटलमार्ग, भुसावळ) आणि विशाल सुपडू ठाकरे (वय २०, रा. कन्हाळा बुद्रुक, वैषनगर, ता. भुसावळ) अशी आहेत. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ५०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आणि ८०० रुपये किमतीची स्टीलची फोल्डिग स्टिक जत करण्यात आली. वाशिवाय मिरची पावडर आणि ३० फूट लांबीचा दोरडी मिळून आला. एमएच १९ डीएफ १८७९ क्रमांकाची ६० हजार रुपये किमतीची आणि एमएच १९ ईएम ०९१८ क्रमांकाची ७० हजार रुपये किमतीची अशा दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.



