Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘रशियन कंपनी’चा बनाव, डॉलर-युरो ट्रेडिंगचे आमिष; वकिलाला लाखोंचा गंडा
    क्राईम

    ‘रशियन कंपनी’चा बनाव, डॉलर-युरो ट्रेडिंगचे आमिष; वकिलाला लाखोंचा गंडा

    editor deskBy editor deskAugust 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रशियन कंपनीने काही भाग भारतात विक्री केले आहे. त्याच्या भागीदारांकडून गुंतवणुकीवर नफा देणार असल्याचे सांगत अॅड. विजय बाबुलाल दाणेज (वय ५७, रा. विसनजी नगर) यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेवून त्यांची ७ लाख ६० हजारात फसवणूक केली. ही घटना दि. ६ जून २०१६ ते दि. २८ मार्च २०२० दरम्यान घडली. या प्रकरणी दि. १८ ऑगस्ट २०२६ विनोद निमानाथ सोनार (रा. कात्रज, पुणे), आनंद परदेशी (रा. पुणे) या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की,  शहरातील विसनजी नगरात राहणारे अॅड. विजय दाणेज हे वकील आहे. त्यांचा जळगावातील एक मित्र पुणे येथील विनोद सोनार याला त्यांच्याकडे घेऊन गेला आणि गुंतवणूक कंपनीविषयी तो माहिती देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सोनार याने सन २०१६ मध्ये भारतात एका रशियन कंपनीने काही भाग विक्री केले आहे. ते एका ऑईल कंपनीच्या नावाने असून त्यासाठी १५ भागीदारांना नियुक्त केले असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच ती कंपनी खरेदीदारांना हस्तांतर केल्याचे सांगत तसा करारनामा व नवनियुक्त संचालकांचे ओळखपत्रही दाखविले. कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी १५ भागीदारांसह पुणे येथील आनंद परदेशी यांची नियुक्ती केल्याचेही त्याने दाणेज यांना सांगितले. या सोबतच रशियन कंपनीसोबत झालेल्या जागतिक कराराच्या बातम्याही दाखविल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करार पार पडल्याचेही त्याने सांगितले.

    कंपनीचे भागीदार भारतातून फंड जमा करून डॉलर व युरो या चलनामध्ये ट्रेडिंग करून गुंतणूकदारांना नफा देणार असल्याचे कागदपत्रे सोनार याने दिले होते. त्यामुळे कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ७२ ते ३६० टक्के नफा, १० टक्के रेफरल कमीशन, १० टक्के बायनरी कमीशन देणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार कंपनीचे एजंट आनंद परदेशी याच्याशी बोलणे करून दिले व दाणेज यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावाने खाते सुरू केले.

    दि. ५ जानेवारी २०१८ रोजी बिट ॉईन खरेदी करण्यास सांगितल्याने दाणेज यांनी ७ लाख १० हजार पाठवून बिट कॉईन खरेदी केले. तसेच त्यांनी आनंद परदेशी याच्या खात्यावर पाठविले. नंतर तीन वेळा त्यांना ३७२ डॉलर कमीशन त्यांनी काढले नंतर मात्र केवळ अभासी नफा दिसत होता, मात्र परंतू तो काढता येत नव्हता. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने विजय दाणेज यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विनोद सोनार, आनंद परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर : ‘बड्या’ संस्थाचालकांनाही चौकशीच्या कक्षेत आणा; जळगावात संशयित कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणीनंतरच !

    August 20, 2026

    चहाच्या टपरीवर धक्कादायक प्रकार : जाब विचारताच चौघांनी पतीला मारहाण; विवाहितेचा विनयभंग !

    August 20, 2026

    सांडपाण्याचा जाब विचारताच संताप : लोखंडी रॉडने महिलेच्या डोक्यात घाव; तांबापुऱ्यात चौघांविरुद्ध गुन्हा !

    August 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.