जळगाव : प्रतिनिधी
घरातील सांडपाणी अंगणात सोडत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन लोखंडी रॉड तसलीमा बी शेख हसन यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल – चौकात शेख मोहसीन शेख हसन (वय ३८) – हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांची आई, पत्नी व बहिण हे – घरासमोर असतांना त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना तुमचे – घराचे सांडपाणी आमच्या अंगणात का सोडता असे विचारले. त्यांनी लागलीच शेख मोहसीन यांच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण सुरु असतांना संशयित अल्तमश उर्फ हिप्या कलीम शहा याने घरातून लोखंडी रॉड आणून तसलीमा बी शेख हसन यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तर बहीणीला देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शेख मोहसीन शेख हसन यांनी दि. १८ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अल्तमश उर्फ हिप्या कलीम शहा, कल्लो कलीम शहा, कलीम शहा, हसनैन कलीम शहा सर्व रा. तांबापुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनोज घुले हे करीत आहे.



