Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साक्षीदाराला संपवण्यासाठी डंपरचा वापर : नांद्री बसस्थानकासमोर रक्तरंजित थरार
    क्राईम

    साक्षीदाराला संपवण्यासाठी डंपरचा वापर : नांद्री बसस्थानकासमोर रक्तरंजित थरार

    editor deskBy editor deskNovember 2, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    विरोधात साक्ष देतो यावरून झालेल्या वादामुळे चार जणांनी एकाला वाळूच्या डंपर खाली चिरडून ठार मारल्याची घटना दि. ३१ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाच्या बसस्थानकासमोर घडली.

    नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी फिर्याद दिली की, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ते त्यांच्या अंगणात मोटरसायकल लावत असताना विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी, मयुर अनिल बोरसे हे वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आले असतांना त्यांच्या ट्रॅक्टरचा ज्ञानेश्वर गोसावी यांना धक्का लागला. ते बोलायला गेले असता विपुल, सागर आणि संजयगिर गोसावी व मयुर यांनी त्यांच्यासह त्याच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी ज्ञानेश्वर गोसावी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी पंचनामा केला, तेव्हा शरद रतन पाटील हे साक्षीदार झाले होते. दुसऱ्यादिवशी विपुल याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध साक्ष दे नाही तर, तू रोडावर सापडला की तुला रोडवर चिपकवून देईल तू कलेक्टरकडे जा की, एसपी कडे जा माझे कोणीच काही करणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी लोकांनी शरद रतन पाटील यांची समजूत घातल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही.

    दि.३१ रोजी रात्री ९:४५ वाजता पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस असल्याने शरद रतन पाटील यांच्यासह काही लोक सावखेडा येथील देव हॉटेलवर जेवायला जात असताना नांद्री बसस्टँड जवळ पातोंडा गावाकडून राखाडी रंगाची एक मारुती कार वेगात आली आणि महेश आत्माराम पाटील यांना कट मारून पुढे गेली. पुढे थांबल्यावर त्यातून विपुल गोसावी, मयुर बोरसे आणि सागर गोसावी उतरले त्यावेळी पातोंडाकडून डंपर क्रमांक एच. आर. ३७ डी ८९५७ वरील चालक भरत सुभाष पाटील खाली उतरला आणि शिवीगाळ करू लागला. त्यावेळी प्रवीण गोसावी बोलला की तुम्ही माणसे मारायला निघाले का तेव्हा विपुल गोसावी चालक भरत याला बोलला की यांना जास्त झाले असून त्यांना चिरडून दे, असे म्हणताच भरत याने जोरात गाडी त्यांच्या अंगावर आणली आणि विपुल व मयुर याने शरद रतन पाटील याला वाहनसमोर ढकलले. सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांना देखील ढकलण्याचा प्रयत्न केला. भरत याने शरद यांच्या अंगावर गाडी चालवली त्यात शरदचे दोन्ही पायाचा चेंदा मेंदा झाला. ते चौघे पळून गेले. शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथे नर्मदा फौंडेशन येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने धुळे येथे रवाना करण्यात आले मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रात्री आ. अनिल पाटील यांनी तातडीने दवाखाण्यात भेट घेऊन उपचारासाठी ५० हजाराची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते यांनी भेट दिली, आ. अनिल पाटील यांनी पोलीस अधिक्षकांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभर यंत्रणा हलली आणि दहिवद फाटा पिंपळी मार्गे पळून गेलेले डंपर बुधगाव येथे पकडण्यात आले. चालकाला रात्रीच अटक करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गाव विक्रीला काढण्याची वेळ आली अन् शरद पवारांनी दिला ५० लाखांचा मदतीचा हात!

    November 2, 2026

    . वरणगावजवळ गोळीबाराचा थरार : तरुणाच्या पोटात झाडली गोळी, लोखंडी रॉडनेही हल्ला

    November 2, 2026

    शिरपूर-कन्हाळा रस्त्यावर भीषण अपघात; पालिका विभागप्रमुखाचा मृत्यू, भगिनी गंभीर

    November 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.