
भारत सरकार नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त; महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समर्थ वाटचाल
अमळनेर: प्रतिनिधी
तालुक्यातील कोंढावळ येथील ‘श्री संत सोपान काका भजनी मंडळ’ हे केवळ भक्तीचे केंद्र न राहता, ग्रामीण भागात समाजपरिवर्तनाचे एक सशक्त माध्यम बनले आहे. भक्तीचा अखंड जागर ठेवत या भजनी मंडळाने संस्कृतीचे जतन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, हे भजनी मंडळ आता शासकीय नियमांनुसार अधिकृतरीत्या नोंदणीकृत (Registered) झाले असून मंडळातील वारकऱ्यांना भारत सरकार नोंदणीकृत संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र देखील डॉ. सुप्रिम महाराज पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.
मंडळाच्या वतीने कोंढावळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दररोज रात्री नित्यनेमाने हरिपाठ घेतला जातो. यासोबतच गावात किंवा परिसरात होणारे विशेष प्रसंग जसे की, कानबाई उत्सव, अभिष्टचिंतन सोहळे, बारसे (नामकरण विधी) किंवा विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये हे भजनी मंडळ अत्यंत सक्रियतेने सहभागी होऊन भक्तीचा रंग भरते. संत साहित्याचा आणि वारकरी विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचे मोठे कार्य मंडळाच्या माध्यमातून केले जात आहे.
डॉ. सुप्रिम महाराज यांचे मार्गदर्शन
या भजनी मंडळाला कार्याध्यक्ष श्री.ह.भ.प. डॉ. सुप्रिम महाराज पाटील (कोंढावळकर) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्याच प्रेरणेने आणि प्रयत्नांतून मंडळाला भारत सरकारचे नोंदणी कृत संस्थांचे अधिकृत प्रमाणपत्र या मंडळाला मिळाले असून, मंडळातील सर्व २१ सदस्य अध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाने ३ गावचे भजनी मंडळ नोंदणीकृत झाले आहेत,चिचखेडे,पातोंडा,कोंढावळ आजच्या आधुनिक युगात तरुण पिढीला संतांचे विचार आणि महाराष्ट्राची थोर भजनी परंपरा टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य हे मंडळ करत आहे.
महिला भगिनींच्या हाती मंडळाची धुरा
भजनी मंडळाच्या मुख्य पदांची धुरा महिला भगिनी अत्यंत समर्थपणे सांभाळत असून नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे अध्यक्ष: सौ. सुरेखा संजय पाटील • उपाध्यक्ष: सौ. मनीषा देविदास पाटील • खजिनदार: सौ. ललिता विलास पाटील
• सचिव: सौ. प्रतिभाबाई भटा पाटील • सहसचिव: मालूबाई नारायण पाटील • कार्याध्यक्ष: श्री.ह.भ.प.डॉ.सुप्रिम संजय पाटील (सुप्रिम महाराज कोंढावळकर ) या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मंडळातील इतर सदस्य आशाबाई अंबादास पाटील, संगीता राजेंद्र पाटील, उर्मिला दिलीप पाटील, वैशाली ज्ञानेश्वर पाटील, विजयाबाई पंजाबराव पाटील, सुनंदाबाई संजय पवार, दिपाली महेंद्र पाटील, प्रतिभा रोहिदास पाटील, शोभाबाई भैय्यासाहेब पाटील, सुनील कांतीलाल पाटील, कमलबाई तुळशीराम पाटील, मालूबाई भालेराव पाटील, ज्ञानेश्वर सीताराम पाटील, विजय संतोष पाटील, बन्सीलाल बुधा पाटील हे सर्व भजनी मंडळाचे कार्य पुढे नेण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सेवाभावी आणि अधिकृत बहुमानाबद्दल संपूर्ण अमळनेर तालुक्यातून कोंढावळ गावाच्या या भजनी मंडळाचे भरभरून कौतुक होत आहे



