Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जी.एस. ग्राऊंड परिसरात कारवाई; दोघे अटकेत, कांचननगरातील घराचीही झाडाझडती
    क्राईम

    जी.एस. ग्राऊंड परिसरात कारवाई; दोघे अटकेत, कांचननगरातील घराचीही झाडाझडती

    editor deskBy editor deskJuly 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाखांचे मॅफेड्रोन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून कारवाईची कुणकुण लागताच त्या दोघांना ड्रग्ज पुरवठा करणारा पेडलर भैय्या सोनवणे हा तेथून पसार झाला. पोलिसांकडून पेडलराचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कांचननगरातील घराची झाडाझडती घेतली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी. एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एम.डी. ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईचे कुणकुण लागताच अंधाराचा फायदा घेत मुख्य ड्रग्ज पेडलर भैय्या सोनवणे हा पसार झाला तर घटनास्थळाहून जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचे ५६.२९ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज मिळून आले.

    पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघ संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी पुरवठा करण्यासाठी आणलेले इम्ज हे भैय्या सोनवणे याने त्यांना पुरविल्याचे सांगितले. पोलिसांकडून संशयित भैय्या सोनवणेचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी संशयित भैय्या सोनवणे याच्या घराची झाडाझडती घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्देवी मृत्यू !

    July 14, 2026

    ऐन हळदीच्या कार्यक्रमात शनिपेठ पोलिसांची धडक; दोन बालविवाह उधळले

    July 14, 2026

    अपघात नव्हे, आई-मुलाला विहिरीत ढकलले! साडेतीन वर्षीय अंध चिमुकल्याचा मृत्यू; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.