Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार
    क्राईम

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    editor deskBy editor deskJune 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कठोरा बुद्रूक शिवारात शेतात तुर पेरणीचे काम करत असताना अचानक वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २९) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव खिलेश किशोर कोळी (वय २१) असे असून तो कठोरा बुद्रुक येथील गट क्रमांक ६० मधील शेतात वडील व मजुरांसोबत तुर पेरणीचे काम करत होता. सकाळपासून कपाशी व व तुर पेरणी तसेच ट्रॅक्टरने शेतात सऱ्या पाडण्याचे काम सुरू होते.

    दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ आकाश, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू असतानाच अचानक विजेचा जोर वाढला. याचवेळी खिलेश शेतात काम करत असताना त्याच्या खांद्यावर वीज कोसळली आणि तो जागीच कोसळून बेशुद्ध झाला. घटनेनंतर उपस्थित वडील व मजुरांनी प्रसंगावधान राखत त्याला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

    मात्र, तेथे उपस्थित डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वरणगाव परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतीकामासाठी गेलेला तरुण परत न आल्याने गावात शोककळा पसरली आहे. खिलेश कोळी हा कोटो येथे अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण घेत होता आणि भविष्यात कुटुंबाला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या अकाली निधनाने एक होतकरू तरुण हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असून परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चिंचोलीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला

    June 30, 2026

    जामनेर तालुका हादरला : महिलेवर सामूहिक अत्याचार ; १४ अटकेत !

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.