Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परवाना मंजुरीसाठी ‘रेटकार्ड’; ३० हजारांची लाच घेताना एसीबीचा सापळा
    क्राईम

    परवाना मंजुरीसाठी ‘रेटकार्ड’; ३० हजारांची लाच घेताना एसीबीचा सापळा

    editor deskBy editor deskJune 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सावकारी व्यवसायाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहकार अधिकारी आणि दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई केली. या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणातील आरोपींमध्ये भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) विजय विनायकराव गरुड, प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते आणि प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे यांचा समावेश आहे.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायासाठी परवाना काढायचा होता. यासाठी त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज केला होता. परवाना मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात सहकार अधिकारी विजय गरुड यांनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रारदाराला लेखापरीक्षक सुरेश विसपुते यांना भेटण्यास सांगितले होते.

    तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत सुरेश विसपुते यांनी स्वतःसह सहकार अधिकारी गरुड आणि लेखापरीक्षक हेमंत काळे यांच्यासाठी एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

    यानंतर एसीबीने सापळा रचला. भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात झालेल्या कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. कारवाईदरम्यान त्यांनी हेमंत काळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असून लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले आहे.  तसेच लाचेच्या रकमेतील काही हिस्सा सहकार अधिकारी विजय गरुड यांना त्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन माध्यमातून पाठविण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीमती रेश्मा अवतारे, पोकों. प्रणेश ठाकुर, पोहेकों . बाळु मराठे सर्व नेमणुक ला.प्र.वि. जळगांव, तपासी अधिकारी लीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि दोन मोबाईल जप्त

    July 20, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.